Marathi

Joke #1

बायको – अहो, माझ्या हातून तुमचा ‌तो निळा शर्ट इस्त्री करताना थोडा जळला.
नवरा – जाऊ दे, हरकत नाही. माझ्याकडे तसाचा अजून एक शर्ट आहे.
बायको – माहित होतं मला, म्हणूनच त्या शर्टाचा तेवढा तुकडा कापून मी तो ह्या शर्टाला जोडला.


Joke #2

बायको - (लाडीक आवाजात) तुम्हाला आठवतंय...लग्नाच्या पहिल्या वर्षी तुम्ही रोज एक गुलाबाचं फूल घेऊन यायचात.
नंतर स्वत:च्या हातानं ते माझ्या केसांत घालायचात.
नवरा - मग?
बायको - मग आता काही नाही?


Joke #3

चिनी लोकांमध्ये बाळाचं नाव ठेवताना घरातलं पितळी भांडं कोपऱ्यात फेकतात आणि जो आवाज होईल ते नाव ठेवतात म्हणे...
थांग.. थुंग... फुंग.. सुंग.. टाँग


Joke #4

प्रेयसी – तुझ्या प्रेमात मी खूप काही गमावलं. मी बरबाद झाले.
प्रियकर – (वैतागून) मग मी काय तुझ्या प्रेमात सरपंच झालो का गं झिपरे???


Joke #5

दुपारच्या वेळी बंद दारावर मोठ्याने टकटक झाली.
जोशी काकू : कोण आहे?
बाहेरून आवाज : मी आहे...
जोशी काकू : मी कोण?

Joke #6

मुलगीः संत्री कशी दिली?
दुकानदारः १०० रुपयांना दहा.
मुलगीः काहीतरी कमी करा की…
दुकानदारः ठीक आहे, ८० ला आठ घ्या.


Joke #7

बायको - (लाडीक आवाजात) तुम्हाला आठवतंय...लग्नाच्या पहिल्या वर्षी तुम्ही रोज एक गुलाबाचं फूल घेऊन यायचात.
नंतर स्वत:च्या हातानं ते माझ्या केसांत घालायचात.
नवरा - मग?
बायको - मग आता काही नाही?


Joke #8

पप्पू एका मुलीला प्रपोज करतो.
पप्पू – आय लव्ह यू
मुलगी – काय, माझ्या चप्पलची साइज बघितलीस का?
पप्पू – ओह हो...प्रपोज काय केलं तर लगेच गिफ्ट मागणं सुरू.


Joke #9

कोल्हापूरचा एक रुग्ण मुंबईच्या डॉक्टरांकडे आला होता.
डॉक्टरांनी पेशंटला विचारलं, ‘तुमच्या कोल्हापुरात तांबडा आणि पांढरा असे दोन प्रकारचे रस्से का खातात?’
रुग्ण – त्याचं काय आहे ना…आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात…तांबड्या आणि पांढऱ्या. मग तांबड्या पेशींना तांबडा आणि पांढऱ्या पेशींना पांढरा रस्सा.

Joke #10

मुंबईकर - काय करता आपण?
पुणेकर - बिझनेस आहे माझा.
मुंबईकर - कसला बिझनेस आहे?
पुणेकर - सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्युअल गारमेंट होल्डिंग डिव्हायसेस

Comments